इंटरनेट - काळाची गरज......

       '  नमस्कार ,मित्रांनो आज आपण इंटरनेट ही काळाची गरज या विषयावर काही खुप अत्यावश्यक माहिती आज आपण या ब्लाॅगमध्ये पाहणार आहोत.
     एकविसाव्या शतकातकातल्या जीवनशैलीच वैशिष्ट्य म्हणजे इनटइंटचा सर्व क्षेत्रात वाढलेला वापर . प्रत्येक व्याक्ती हा इंटरनेटशी पूर्णपणे संबंधित आहे. जसे एकमेकांशी संपर्क साधाणे, संदेश पाठवणे, माहिती गोळा करणे हे प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून करता येते आणि याच सर्व गोष्टींमुळे आज इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस  वाढत चाललेला आहे. आज आपण संगणकाच्या मदतीने किंवा मोबाईल फोन च्या साह्याने आपण कोणतेही काम अवघ्या काही सेकंदात करू शकतो.
Image result for internet kalachi garaj in marathi
        इंटरनेटच्या साह्याने आज आपण माहितीचे देवाण-घेवाण करु शकतो. एकमेकांशी संदेश साधण्यासाठी आज जगात अनेक गोष्टी आहेत. जसे व्हाट्सअप, फेसबुक ,ट्विटर, ई-मेल इत्यादी अनेक अॅपलिकेशन चा वापर करून आपण सोप्या व लवकरात लवकर चांगले सहज करू शकतो.इतके च नाही तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वर्तमानपत्राची जागा ही गुगल न्यूज, याहू न्यूज, युसी न्यूज, जागरण इ. अनेक प्रकारच्या एप्लीकेशन घेतली आहे. आपण कोणतीही न्यूज किंवा माहिती एका काही सेकंदात संपूर्ण जगात पोचवू शकतो.
      पुस्तक, कपडे , फर्निचर, औषध, खाद्यपदार्थ, अशा प्रकारच्या अनेक सोयीच्या वस्तू आपण घरी बसल्या बसल्या इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करू शकतो. आणि आज जगात याच सर्व प्रकारचे साहित्य खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी स्पेलिंग जाते. इतके च नाही तर  बँकेचे व्यवहार असो, इलेक्ट्रॉनिक्स वास्तु, सेल्स टॅक्स भरायचा असो, रेल्वे किंवा विमान प्रवासच नाही , तर गावातल्या गावात कुठे जायचं या सगळ्या साठी आज इंटरनेट वापर केला जातो. त्यामुळे आज राहणीमान व दैनंदिन जिवनात खूप फरक आलेला आहे इंटरनेट च्या साह्याने कोणतेही काम अवघ्या काही सेकंदात आपण करतो त्यामुळे आपला वेळ व पैसा दोन्ही वाचते.
       आज प्रत्येक क्षेत्रात कंप्युटर चा वापर केला जातो त्यामुळे इंटरनेटचे महत्त्व खूप वाढले आहे. इंटरनेटच्या साह्याने कोणती माहिती आपण काही सेकंदात मिळवतो. त्यासाठी आज अनेक साधने उपलब्ध आहेत. जसे गुगल, क्रोम, यूट्यूब च्या साह्याने आपण कोणतीही माहिती ,छायाचित्रे, व्हिडिओ, गाणी, इतकेच नाही तर कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक अडीअडचणी आपण वरील गोष्टींच्या आधारे दूर करू शकतो किंवा माहिती घेऊ शकतो.
      आजच्या वाढत्या इंटरनेट टेक्नॉलॉजी च्या काळात व्यक्तीला कमीत कमी इतके तरी यायला हवे इंटरनेट वापरायला यायला हवे. (खालील प्रमाणे दिलेल्या गोष्टी आपल्याला थोडक्यात यायला हवे)

  1. नेट बँकिंग (ऑनलाइन पैसे पाठवणे, जमाखर्च तपासणे, पैसे भरणे )
  2. बिल भरणे (लाईट बिल, मोबाईल इंटरनेट इत्यादी ऑनलाइन बिल भरणे)
  3. ऑनलाइन शॉपिंग (इलेक्ट्रॉनिक वस्तू ,पुस्तक, औषधे इत्यादी ऑनलाईन खरेदी करणे.)
  4. वेब ब्राउझिंग (इंटरनेट वर माहिती गोळा करणे)
  5. स्मार्टफोन आणि संगणक वापरणे.
        वरील गोष्टींचा आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक व्यक्तीला थोडातरी वापर करता यायला पाहिजे.  ही काळाची गरज आहे. म्हणूनच इंटरनेट काळाची गरज आहे. पण म्हणून इंटरनेटचा अतिवापर टाळावा. गरजेनुसार इंटरनेट वापरला पाहिजे, जर अति वापर केला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो, आपल्याला मानसिक ताण- तणाव निर्माण होतो.
                                                                                                                                             
                                                                                                                  आकाश.दळवी.
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियाचा वाढता वापर......||Social Media in Marathi 2023

आपली मुंबई | aplee mumbai | aplee mumbai in marathi