सोशल मीडियाचा वाढता वापर......||Social Media in Marathi 2023

 नमस्कार",  मित्रांनो !!!! आज आपण या  ब्लॉगमध्ये  सोशल मीडियाचा वाढता वापर, या विषयावर सोप्या व विस्तारी माहिती घेणार आहोत. आजच्या एकविसाव्या शतकात सोशल मीडिया चे  फायदे- तोटे  परिणाम दुष्परिणाम आपण या ब्लॉगमधे पहाणार आहोत. 


एकविसाव्या शतकात मानव हा एक वेळ अण्णा पाणी शिवाय राहू शकत परंतु सोशल मीडिया  शिवाय राहू शकत नाही. सोशल मीडिया  जानू काय मानवाचा अविभाज्य अंग बनलेला आहे.


What IS Social Media In Marathi... Advantages and Disadvantages Of Social Media In Marathi..??
  • social media म्हणजे काय ❔
  • social media  म्हणजे social media  म्हणजेच ?..

 "वेबसाईट  आणि ॲप्स ज्या वापरकर्त्यांना सामग्री (content)  तयार आणि सामाजिक  माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास  किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये भाग घेण्यास सक्षम करतात". मराठी भाषेत याला "सामाजिक माध्यम" असा शब्द आहे. प्रत्येक व्यक्तीला मते मांडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमावर ती आहे.

मित्रांनो सोशल मीडिया चे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे आपणास सांगण्याची गरज नाहीच आहे,  आज घरात  शाळकरी मुलापासून  तेल घरातील मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोशल मेडिया वेड लागलेले आहे.

    आज सोशल मिडियाचे अनेक  माध्यमे आपल्यासमोर  उपलब्ध आहेत, जसे की फेसबूक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम ,ट्विटर ,युट्युब अशा प्रकारचे अनेक  ॲप्स किंवा वेबसाईट आज आपल्या सर्वांना उपलब्ध आहे याच ॲप्स किंवा वेबसाईवर  आपण आपले स्वतःचे खाते म्हणजे (profile account)  उघडून  त्यावर आपण आपले स्वतःचे छायाचित्र  व्हिडिओज त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सुखदुःख आपण  आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा आपल्या इतर चाहत्यांसमोर (followers)  आपल्या अकाउंट मध्ये पोस्ट करू शकतो.  हा सोशल मीडियाचा सर्वात मोठा फायदा आहे.  सोशल मीडिया मुळे आपण अनेक लोकांशी न भेटता हि मैत्री करू शकतो त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्स च्या मदतीने पाहू शकतो. चेकच्या मार्गाने त्यांच्याशी बोलू शकत असे अनेक सोशल मीडियाचे लहान-मोठे फायदे आहेत.सोशल मीडिया  फक्त एवढेच फायदे  नाहीत, असे अनेक सांगते आहेत त्या पण खालीलप्रमाणे पाहूया.
 
    आपण  जसे समजत असू की सोशल मीडिया चे फायदे फक्त मेसेज, व्हिडीओस - फोटो शेअर करण्यासाठी आहे तारीख असे नाही आहे. आज अनेक लोक यु ट्यूब व्हिडिओस आणि इंस्टाग्राम (Instagram reels)  च्या माध्यमाने आपले लहान-मोठे व्हिडिओ स्वतःच्या  चांगल्या कॉन्टॅक्ट (content)  च्या मदतीने मेहनत करून अनेक लोकांनी पैसे व प्रसिद्धी सोशल मीडिया च्या माध्यमाने मिळवली आहे. मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रसिद्धी मिळवणे सोपे नाही परंतु मेहनत कारण हे आपल्या हातात असते. आज अनेक लोक इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब च्या मदतीने अनेक लहान-मोठे  बिझनेस  तरुण आपले उदरनिर्वाह करत आहेत, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात पैसेही कमवत आहे.


    मित्रांनो युट्युब आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया ची आजच्या काळातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म म्हणून समोर आले आहे .याचाच फायदा अनेक लोक घेत आहे आणि ते बिझनेस  किंवा युट्युब वर व्हिडिओस बनवून  पैसे कमवत आहेत. या सोशल मीडिया एप्स चा वापर करून आपल्यासारखे  सर्वसामान्य नव्हे तर अनेक मोठमोठ्या कॉमर्शियल कंपन्या सुद्धा या प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेक मोठ मोठे बिजनेस आपल्या  कंपन्यांच्या प्रोडक्स च्या जाहिराती या ॲप्स द्वारे करत आहेत.


  • सोशिअल मिडीयाचे तोटे ?
  • सोशिअल मिडीयाचे होणारे नुकसाण ?


मित्राणो सोशिअल मिडीयाचे आपण फायदे पाहीले . परंतु - निर्सगाचा नियमच आहे,  की जसे नाण्याच्या दोबाजु असतात . तसेच कोणत्याही  गोष्टीचे  चांगले परिणाम असतात तसेच वाईट  परिणामही असतात.  म्हणजेच फायदे असले की तोटेही आलेच.

 
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणूस हा माणसाची दूर झालेला आहे हल्ली मानव हा  घरातल्या घरात राहण्यास जास्त प्राधान्य देत आहे. त्यामुळे चिडचिडेपणा मानसिक आजार  वाढला आहे. याचा जास्त परिणाम शाळकरी व तरुण वयातील मुलांवर झाला आहे. त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष असून इंस्टाग्राम (Instagram reels) (YouTube video)  सारख्या गोष्टींवर जास्त लक्ष असल्याकारणाने अभ्यासात लक्ष नाही त्यामुळे त्यांचा पुढील आयुष्यावर परिणाम होत आहे. अशा सोशियल ॲप्स मुळे लहान मुलांवर जास्त परिणाम होत आहे अनिल गोष्टी त्यांना ह्या ॲप्स द्वारे लहान वयातच समजत आहेत याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होणारा असून अशा गोष्टींवर आईवडिलांनी लक्ष दिले पाहिजे जर आपण आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला स्मार्टफोन देत असू तर ते त्यामध्ये काय तेव्हा काय पाहत आहेत  यावर त्याने लक्ष दिले पाहिजे.
सोशल मीडियावर जेवढे चांगले कॉन्टेन्ट (content)  आहेत.  त्यापेक्षा अधिक दुप्पट वाईट कृतीचे कॉन्टेन्ट प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे अशा गोष्टींमुळे सोशल मीडियाचा वाईट परिणाम होतो.
 
सोशल मीडियावर अनेक लोक चांगल्या पद्धतीने बिजनेस करत आहे, परंतु अनेक लोक याच ॲप्स चा वापर करणे अनेक  मोठमोठ्या पद्धतीने व वेगवेगळ्या पद्धतीने छायाचित्रे व्हिडीओज प्रोडक्स दाखवून फसवा फसवी चा व्यापार करत आहेत अशा लोकांचे आपल्याला सावध राहिले पाहिजे.

मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात सोशल मीडिया चे फायदे आणि तोटे म्हणजे सोशल मीडिया पासून होणारे परिणाम दुष्परिणाम याची थोडक्यात माहिती घेतली असून सोशल मेडियाचा  योग्यरीत्या वापर केला तर ते आपल्या खूप  उपयोगी  आहे.  तू परंतु त्याचा जास्त वापर  केल्यास चे नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर केला पाहिजे व चांगल्या कामासाठी वापर केला पाहिजे.
 शाळकरी किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर आई-वडिलांनी लक्ष दिले पाहिजे. की आपला मुलगा किंवा मुलगी काय करत ,आहेत काय पाहत आहेत, कोणाशी बोलत आहे, याचे आई-वडिलांनी चौकशी केली पाहिजे . जेणेकरून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही.




                                                                                                                           आकाश.दळवी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंटरनेट - काळाची गरज......

आपली मुंबई | aplee mumbai | aplee mumbai in marathi